Aji Maji GIRGAONKAR

गिरगाव हा एक भूभाग नसून ती एक संस्कृती आहे तो एक विचार आहे, ते एक कुटुंब आहे. आणि गिरगावकर हि फक्त स्थलवाचक उपाधी नसून ती एक पदवी आहे! गिरगाव हे नाव ऐकलं की ज्याचे कान टवकारतात, छाती फुगते, डोळ्यात अभिमान जागृत होतो आणि मनात आपुलकी निर्माण होते तो आपला गिरगावकर. तो पूर्वी आणि आत्ता कुठे राहतो , त्याचा मुंबई नंबर काय, त्याची जात आणि धर्म काय, तो मराठी की अमराठी, स्त्री की पुरुष, तरुण की म्हातारा, सुशिक्षित की अशिक्षित, गरीब की श्रीमंत ह्या सर्वाचा त्याच्या गिरगाव प्रेमाशी काही संबंध नाही! गिरगावाबद्दल वाटणारी अस्मिता आणि प्रेम हा एकच निकष आहे ह्या ग्रुपचा सदस्य व्हायचा! हा ग्रुप गिरगावावर प्रेम करणाऱ्यांचा आहे. त्यांना एकत्र आणन्यासाठी आणि आनंदासाठी आहे. आहात गिरगावकर तर व्हा सामील! आपलं स्वागत आहे आपल्याच ग्रुपमध्ये!