Sindhudurga's PHOTOGRAPHY

चला सिंधुदुर्ग घडावुया!

सिंधुदुर्ग जिल्हा हा 'कोकण' या उंच पठारी प्रदेशाच्या पश्चिमेला असून ऐतिहासीक रीत्या आपल्या आपल्या लांब तट रेखा आणि सुरक्षित बंदरे यांसाठी प्रसिद्ध आहे. हा जिल्हा पूर्वी रत्नागिरी जिल्ह्याचा एक भाग होता. परंतु १ मे १९८१ पासून प्रशासकीय सुविधा तसेच औद्योगिक आणि कृषी विकास यांच्या साठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा २ जिल्ह्यात विभागीत करण्यात आला. या जिल्ह्याला येथील प्रसिद्ध 'सिंधुदुर्ग' किल्ल्याचे नाव देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण, देवगड, कणकवली, वैभववाडी आणि दोडामार्ग अशा ८ तहसील केंद्रांचा समावेश होतो. सिंधुदुर्ग जिल्हा हा ५,२०७ चौ.किमी. क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. हा जिल्हा सुंदर समुद्र किनाऱ्याने, सुरम्य पर्वताने आणि प्राकृतिक तसेच नैसर्गिक सौंदर्याने सजलेला आहे. येथील उष्ण-कटिबंधीय फळे जसे की जगप्रसिद्ध हापूस (अल्फांसो) आंबा, काजू व जांभूळ इत्यादी साठी सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जातो.

शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते.
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणाजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला.
या किल्ल्याचे बांधकाम नोव्हेंबर २५, इ.स. १६६४ रोजी सुरु झाले. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ व ४५ दगडी जिने आहेत.या किल्ल्यामध्ये महाराश्ट्रातील एकमेव शिवाजी महाराजांचे शंकराच्या रुपातील मंदीर आहे.याची स्थापना ‍राजाराम महाराजांनी केली होती. किल्ल्यावर शिवकालिन ३ गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत.त्यांची नावे दूध विहीर,साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. असा बोलला जाता कि, हा किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन खर्ची पडले. उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. या जागी प्रवेशद्वार आहे हे लक्षात येत नाही. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर बारा वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ २२८ फूट उंच होता. त्यामुळे समुद्रातून दूरवरुन तो ध्वज सहज दृष्टिस पडत होता. ध्वजाला पाहून मच्छिमार खडकापासून लांब राहत असत.

भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून, इ.स. १९१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.


मग अश्या या ऐतिहासिक महत्व असणाऱ्या आपल्या जिल्ह्याला पर्यटन क्षेत्रात अधिक उंचीवर घेऊन जाऊया.
मी हा Facebook Group बनवलाय ज्याद्वारे आपण सर्वांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सौंदर्य दाखवणारे छायाचित्रे प्रसारित करूया.

चला सिंधुदुर्ग घडावुया!