Nandedians

*****ALL MEMBERS PLEASE READ*****
हा नांदेडियंस ग्रुप असल्यामुळे येथे शक्यतो नांदेड संदर्भातिलच पोस्ट टाकाव्यात, कोणालाही काहीही तक्रार असल्यास त्वरित अडमिंस ला मेसेज द्वारे कळवावे.
ह्या समुहावर आपण लेखनाच्या माध्यमाने किव्हा छायाचित्र/ऑडिओ-व्हिडीओ स्वरूपात कोणत्याही परिसंवादावर किव्हा चर्चेवर मोकळेपणाने भाग घेऊ शकता. साहित्य, चित्रपट, नाटक, संगीत, पौराणिक ग्रंथ, इतिहास, राजकारण, अर्थकारण, सामाजिक, भविष्य, व्यावसायिक (उद्योग धंदे), सर्वं प्रकारच्या कला आणि विद्या इत्यादी अभ्यासपूर्ण, वाचनीय, व्यवस्थित व तर्कशुद्ध तसेच निर्भिडपणे आणि परखडपणे मांडलेली असावी. उहासात्मक किव्हा विडंबनात्मक लिखाण हे कुणाचा आक्षेप नसल्यास समुहावर द्यायला काहीच हरकत नाही. ह्या समुहावर वावरताना आपण आपला मुद्दा लेखनाच्या माध्यमाने किंवा ऑडिओ-व्हिडीओ स्वरूपात मांडताना एकांगी व पूर्वग्रहदुषित विचारसरणीतून/ वैयक्तिक द्वेषभावेतून डोकावता कामा नये. आपल्या मुद्द्यांच्या समर्थनार्थ विविध उदाहरणे-दाखले-संदर्भ देणे, विषयाच्या विविध पैलूंचे गरजेनुरूप विश्लेषण करणे, सुलभ आणि शैलीदार परिभाषेचा वापर करणे ही परिणामकारक अभिव्यक्तीची काही लक्षणे/वैशिष्ट्ये आहेत, ह्याचे प्रत्येकाला भान असावे. वैयक्तिक द्वेष/ वैयक्तिक चिखलफेक, असभ्य-गलीस्च्छ-अश्लील, शिव्या-शाप, तिरस्कारात्मक, वैयक्तिक प्राणीवाचक व जातीवाचक प्रयोग, द्वेष-मत्सर पसरविणाऱ्या, भडकाऊ व चिथावणीखोर शब्दांचा (छायाचित्र/ऑडिओ-व्हिडीओ) प्रयोग ह्या समुहावर करू नये. विषयाची मांडणी करताना शब्दांची-मुद्द्यांची योजना ‘यथार्थ‘ असणे अपेक्षित आहे. निंदा-नालस्ती-अपमान करण्यासाठी तसेच वैयक्तिक किंव्हा सामुहिक भांडण्यासाठी ह्या समुहाचा वापर करू नये. अशा प्रकारच्या लिखाणातून फक्त असंतोष वाढीस येतो आणि भावना दुखावल्या जातात, बाकी काहीही साध्य होत नाही. विषयवस्तूचा ‘रास्त’ आशय व्यक्त करणारी परिभाषा लिखाणातून झळकली पाहिजे. शब्दांचे प्रयोग कोणतीही असंबद्धता निर्माण करणार नाहीत, याची काळजी घेण्यात यावी. थोडक्यात, मांडलेले विचार विषयवस्तूच्या संदर्भात अप्रस्तुत ठरणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. आपल्या लिखाणातून सकारात्मक व रचनात्मक विचारशैली प्रदर्शित होईल, यासाठी विशेष जाणीवपूर्वक प्रयत्न केले जावेत. सर्वात महत्वाचे - स्वतःचे विचार जबरदस्तीपणे दुसऱ्यांवर थोपवू नयेत. अत्यंत महत्वाची बाब म्हणजे ह्या समुहावर लेखन स्वरूपात व्यक्त केलेल्या पोस्ट किव्हा कमेंट्सची (चित्र-photo आणि चलचित्र-Video, Audio स्वरूपात सुद्धा) जवाबदारी हि सर्वस्वीपणे वैयक्तिक ज्याची त्याची असेल. ह्या समुहावर समाविष्ट करून घेतलेल्यांच्या लेखनाशी, मतांशी, विचारांशी किव्हा त्यांच्या भूमिकेशी (चित्र-photo, चलचित्र-Video, Film स्वरूपात सुद्धा) समुहाचे व्यवस्थापक सहमत असेलच असे नाही आणि जवाबदारही असणार नाहीत. ह्या समुहावर आपला सहभाग पूर्णपणे ऐच्छिक असून केल्या जाणाऱ्या पोस्ट कॉमेंट आपणास वरील बाबी मान्य असल्याचे निदर्शक आहे याची सर्व सभासदानी कृपया नोंद घ्यावि.
******************************
नांदेडबद्दल माहिती हवी आहे का तुम्हाला ?
पण तुम्हाला खरंच नांदेडबद्दल जाणून घ्यायचं असेल तर अगोदर तुम्हाला नांदेडीअन्सना जाणून घ्यावे लागेल.
आणि नांदेडीअन्सला जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा ग्रूप जॉईन करावा लागेल.
या, आत बरंच काही आहे.

http://en.wikipedia.org/wiki/Nanded