तू ..... निखळ हसणारी एक चांदणी,
तू ..... निखळ हसणारी एक चांदणी,
अन मी बावरलेला एक चंद्र ....
तू पावसाच्या पहिल्या सरीचा थेंब,
अन मी त्या थेंबातले प्रतिबिंब ....
तू ....सोनेरी संध्याकाळ काहुरलेली,
अन मी तुझ्यात बुडणारा सूर्य हुरहुरलेला....
तू एक लाट किना-याजवळ घुटमळणारी,
अन मी किनारा तुला अडवू पाहणारा ...
तू .... सावली उन्हामधली मला बिलगून चालणारी
अन मी एक उनाड ढग तुला लपवणारा
तू एक मोरपीस मोहरलेले अन
मी पुस्तकाचे पान तुला आयुष्यभर जपणारा
तू .... एक वेल प्राजक्त फुलांची
अन मी त्याभोवतीचा बेधुंद सडा
तू पावसाची एक वेडी सर ...अन मी त्यात भिजणारा पाउसवेडा .